कुटुंबातील नऊ जणांचा वाढदिवस एकाच दिवशी

पाकिस्तानातील एका कुटुंबाने अनोखा विक्रम केला आहे. त्या कुटुंबातील नऊ जणांची जन्मतारीख एकच आहे… ती म्हणजे 1 ऑगस्ट. या दिवशी त्या कुटुंबात सात मुलांचा जन्म झालाय. तसेच मुलांच्या आईबाबांचीही तीच जन्मतारीख आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीखही तीच आहे. या कुटुंबाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. सिंध प्रांतातील लरकाना येथे आमिर आली आणि त्यांचे विक्रमी कुटुंब राहते. त्यांनी हा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम  अमेरिकेतील कुटुंबाच्या नावावर होता.