
बिग बॉस 19 च्या विजेतेपदाची थोडक्यात हुलकावणी मिळालेली फरहाना भट्ट ही फर्स्ट रनर अप बनली. या शोनंतर तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझी बिग बॉसच्या ट्रॉफीवर कधीच नजर नव्हती. मी तर लोकांचे हृदय जिंकण्यासाठी या शोमध्ये आली होती, आणि यात मला यश मिळाले, असे फरहानाने म्हटले आहे. बिग बॉसमध्ये येण्याचा माझा उद्देश होता की लोकांच्या हृदयात थोडी जागा बनवू. आता असे वाटते की, माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. गौरव खन्नाला ट्रॉफी मिळाल्यानंतर फरहाना म्हणाली की, ट्रॉफी जर गौरव खन्नाला मिळाली असली तर लोकांचे हृदय जिंकण्यात मी यशस्वी झाले आहे. मला माहीत होते की, मी टॉप 2 पर्यंत पोहोचेल. जय-पराजय हा होतच राहतो. त्यात नवीन काही नाही, असेही ती म्हणाली.



























































