
शेतमालाला हमीभावासह विविध मागण्यांसाठी तब्बल 34 दिवसांपासून खनौरी बॉर्डरवर उपोषणाला बसलेले शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी आज उपचार करून घेण्यास नकार दिला. अशाप्रकारे उपचाराच्या बहाण्याने मला खनौरी बॉर्डरवरून किंवा उपोषण स्थळावरून दूरवर नेण्यात येऊ शकते अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
सर्वोच्च न्यायालायने डल्लेवाल यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालल्याच्या मुद्यावरून पंजाब सरकारला फैलावर घेतले होते. तसेच डल्लेवाल यांना रुग्णालयात हलवण्यात येत नसल्याबद्दल सरकारचे कान उपटले होते. या पार्श्वभूमीवर सरकारकडून त्यांच्यावर उपचार करण्याच्या हेतूने त्यांना रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आज सरकारचे उच्चस्तरीय पथक डल्लेवाल यांच्या प्रकृती चौकशी करण्यासाठी खनौरी बॉर्डरवर पोहोचले. पोलिस उपमहानिरीक्षक मनदीप सिंग सिधु आणि निवृत्त अतिरीक्त पोलिस महानिरीक्षक जसकरण सिंग यांनी डल्लेवाल यांचा पथकात समावेश होता.
























































