पावसाळय़ात यंदा 2391 जणांचा बळी गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांची माहिती

338

या वर्षी देशभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल 2 हजार 391 लोकांना आपला जीव गमवावा लागला असून आठ लाखांहून जास्त घरांचे नुकसान झाल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली.

अनेक राज्यांत मुसळधार पाऊस आणि पुराच्या उद्रेकानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची मदत घेण्यात आली. या दलाच्या 179 पथकांनी 98 हजार 962 माणसे आणि जवळपास 617 जनावरांना पुराच्या पाण्यातून वाचवले आणि 23 हजार 869 जणांना वैद्यकीय सुविधा पुरविल्या, असेही राय यांनी पुढे स्पष्ट केले. यंदा देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुराने थैमान घातले होते.

आपली प्रतिक्रिया द्या