शेतकऱ्यांचा शिल्पकार

274

>> संजीवनी धुरी-जाधव

शिल्पकार रतन साहा. शेतकऱ्यांचे कष्ट, त्यांची मेहनत या साऱया ‘गोष्टींना त्यांनी आपल्या शिल्पकलेत उतरवले आहे.

अन्नदाता म्हणजे आपला शेतकरी. त्याला आपल्या देशाचा कणा म्हणून ओळखले जाते. या शेतकऱयाचा गौरव करणारे ‘गॉड ऑफ सीड्स- द फार्मर’ असे अनोखे शिल्पप्रदर्शन कलाप्रेमींना पाहायला मिळणार आहे. रतन साहा या अवलियाने तब्बल चार वर्षांच्या मेहनतीने त्यांची ही कला सादर केली आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या कलेविषयी.

रतन सहा हे एक शिल्पकार आहेत. वेगवेगळ्या धातूंपासून शिल्प ते तयार करत असतात. बडोद्यातून मास्टरी करून मुंबईत ते स्थायिक झाले. त्यांचा गोरेगावमध्ये स्टुडिओ आहे. रतन सहा यांना सामाजिक विषयांची आधीपासून आवड असल्याने त्यांच्या कलेतून कायम सामाजिकता दिसते. मग नोटाबंदी असो, उत्तराखंडचा पूर असो, किंवा जागतिकीकरण अशा विविध विषयांवर त्यांनी शिल्पप्रदर्शन भरवले आहेत. त्यांना शेतकरी हा विषय निवडण्याबाबत विचारले असता ते सांगतात की उत्पन्न कमावण्यासाठी लाखो व्यवसाय आहेत, पण या व्यवसायात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतमालाला मिळणारा कमी हमीभाव, दुष्काळ, कर्जबाजारीपणा या सगळ्याला कंटाळून केलेली आत्महत्या ही शेतकऱयांची व्यथा आहे. शेतकरी हा देखील माणूस आहे. आपल्याला अन्न पुरवण्यासाठी त्याची मेहनत असते. त्यांचे आपण स्मरण करायलाच हवे. त्यामुळे त्यावर प्रकाशझोत टाकण्यासाठी हा विषय निवडला. हे प्रदर्शन शेतकऱयांना समर्पित केले आहे. शेतकऱयांवर आधारितच हे शिल्प प्रदर्शन भरवत असल्याचे रतन सहा यांनी सांगितले.

शेतकऱयांबाबत आपण अनेक घटना ऐकत, पाहत असतो पण प्रत्यक्षात जेव्हा त्या ठिकाणी पाहायला गेलो तेव्हा वास्तवाचे दर्शन घडते. त्यांच्या समस्या, व्यथा कळतात. जेव्हा शेतकऱयांना भेटायला गेलो त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली की त्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळत नाही हे तिथे गेल्यावर लक्षात आले. काही वेळेला ते खर्च करतात तेवढेही पैसे त्यांच्या पदरी पडत नाहीत, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी हे प्रदर्शन फक्त माहिती वाचून, पाहून नव्हे तर प्रत्यक्षात तिथे जाऊन तीनशे शेतकऱयांना भेटून त्यांच्या व्यथा जाणून त्यांनी ही शिल्पचित्रे तयार केली आहेत. ‘द ग्लोरी’, ‘सिकल’, ‘द डॉटर’, ‘द हेड’ आदी  18 शिल्पकला बनकून शिल्पकार रतन साहा यांनी शेतकऱयांना दिलेली मानकंदना आहे. त्यासाठी चार वर्षे त्यांनी मेहनत घेतली. या शिल्पचित्रांमध्ये तांबे, पितळ आणि कास्य या धातूंचे मिश्रण करण्यात आले आहे. शेतकरी देशाचा कणा आहे आणि त्याचा जीवनसंघर्ष प्रभावीपणे मांडून त्याला समाजात आदर मिळावा या भावनेने हे शिल्पप्रदर्शन भरवण्यात आल्याचे साहा सांगतात.

शेतकरी म्हणजे अन्नदाता, पण या अन्नदात्याचा सगळ्यांना विसर पडला आहे. अन्न घेताना त्या शेतकऱयाचे स्मरण करायला हवे. शेतकऱयांचा गौरव करण्यासाठी हे प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनात ‘द चॅरियट’ हे शिल्प आहे त्यात  8 फूट उंच ट्रक्टर असून  तो 700 ते 800 किलो कजनाचा आहे. हा ट्रक्टर शेती करण्यासाठी महत्त्वाचे वाहन मानले जाते. हे ‘द चॅरियट’मधून दिसून येते म्हणजेच त्या ट्रक्टरप्रमाणे शेतकऱयांसाठी मदत करणे क त्यांना योगदान देणे आकश्यक आहे. दुसरे शिल्प म्हणजे 6 फूट उंचीचे ‘द फादर’ हे शिल्प. या शिल्पातून एका शेतकऱयासाठी आपल्या शेतीबद्दलची कल्पना दिसते. जसे आई आपल्या बाळाची काळजी करते तसेच शेतकरी आपल्या शेतीची काळजी करत असतो. अगदी तसाच शेतकरी शेतीसाठी आई असतो इतकी सुंदर कल्पना त्यांच्या या कलेत दिसते. त्यात एका शिल्पचित्रात एक टिफीन बॉक्स आहे. आपल्याला जो घरुन डबा घेऊन येतो त्याचे आपण आभार मानतो आणि जेव्हा ते अन्न घेतो तेव्हा त्याची चव आवडते आणि आपण आईच्या स्वयंपाकाचे कौतुक करतो, पण केव्हाही शेतकऱयाची आठवण काढत नाही. ती भाजी आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी शेतकऱयाचीच मेहनत किती असते त्याची आपण साधे स्मरणही करत नाही. हे प्रदर्शन म्हणजे शिल्पकार रतन साहा यांनी शेतकऱयांना दिलेली मानकंदना आहे. यात एक चित्रफीत आहे त्याला आम्ही नाव दिलेय रिफ्लेक्शन. त्यात  मी ज्या शेतकऱयांना भेटलो त्यांच्या मुलाखती आहेत त्याच्यात ती दाखवण्यात  येणार आहे.

‘गॉडस् ऑफ सीडस् द फार्मर’ही या शिल्प प्रदर्शनात ‘द चॅरियट’ आणि ‘द फादर’ ही शिल्पचित्रे प्रदर्शनाचे आकर्षण आहेत. ‘गॉडस् ऑफ सीडस् द फार्मर’ ही या शिल्प प्रदर्शनाची थिम आहे.  हे प्रदर्शन 18 नोव्हेंबरपर्यंत फोर्ट येथील काळाघोडा जहांगीर आर्ट गॅलरीत मोफत असून सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या