
सामना प्रतिनिधी । नगर
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. १० दिवस शेतकऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. आज नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध शेतकरी संघटनांच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले. यावेळी जनावरांना घेऊन शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले असून त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
दुधाला भाव द्यावा शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य किंमत मिळावी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे तात्काळ मिळावे, यासह विविध मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी मांडल्या आहेत. जिल्ह्यामध्ये सर्वत्र आंदोलनाला सुरुवात झाली असून शेतकरी संघटनेच्यावतीने सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला आहे.



























































