औसा तालुक्यातील वाघोलीतील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

औसा तालुक्यातील वाघोली येथील एका वयोवृद्ध शेतकऱ्यांने खाजगी बँकेच्या कर्जाचा तगादा लागल्यामुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे. शिवाजी एकनाथ पवार ( वय 65, रा. वाघोली) यांच्याकडे पाच एकर शेती होती. त्यावर खाजगी बँकेचे 55 हजार रुपये कर्ज होते. कर्जाचा तगादा व नापिकीमुळे रविवारी शिवाजी पवार यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. लातूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन केल्यानंतर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. शिवाजी पवार यांच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या