
सामना प्रतिनिधी । प्रतिनिधी
तालुक्यातील वाघे बाबळगाव येथील शेतकरी सज्जन महादेव घायाळ (42) यांनी शनिवारी सकाळी त्यांच्या शेतामधील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमागचं कारण अद्याप अजून समजू शकलेले नाही. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मंदाकिनी व दोन मुले आहेत.
सकाळी काही शेतकरी शेतामध्ये कामासाठी गेले असता त्यांना घायाळ यांनी आत्महत्या केल्याचे दिसले. शेतकऱ्यांनी तात्काळ याबाबत पोलीस प्रशासनाला कळवले. या घटनेचा पुढील तपास नांदुर घाट पोलीस चौकीचे हेडकॉन्स्टेबल मुकुंद ढाकणे, पोलीस नाईक बाळू सोनवणे व पोलीस नाईक सानप हे करत आहेत.


























































