शेतकरी, कष्टकरी बांधवांचा सरकारविरोधात एल्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । ठाणे

खान्देशातील शेतकरी, कष्टकरी आणि भूमीपुत्रांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला. आज पहाटेपासून ठाण्याच्या आनंदनगर चेकनाका येथे शेतकरी बांधव एकत्र जमू लागले होते. त्यामुळे या भागात प्रचंड गर्दी झाली होती. न्याय हक्कांच्या मागण्यासाठी जोरदार घोषणाबाजी सुरू होती.