कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

27

सामना प्रतिनिधी । वडीगोद्री

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील हस्तपोखरी येथील शेतकरी सोमिनाथ जगनराव गाढे (४२) या शेतकऱ्यानी कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ जुलै रोजी मंगळवार रोजी उघडकीस आली.

शेतकरी सोमीनाथ गाढे यांना तीन एकर कोरडवाहू जमीन असुन यावर उदानिर्वाह होत नसल्यामुळे ते गावातच मजुरी करायचे. त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे. तीन महीन्यापुर्वी त्यांच्या मोठ्या मुलीचा विवाह झाला. यासाठी त्यांनी काही उसणवारी म्हणून पैसे घेतले होते तसेच एका बँकेचेही ९० हजार रुपये कर्ज असल्याची माहिती मिळाली. सततच्या दुष्काळाच्या झळा व कर्जबाजारीपणा तसेच मुला मुलीचे शिक्षण, खर्च या सर्व गोष्टीमुळे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे अंबड पोलीसांना दिलेल्या जबाबात नमुद केले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या