देशभरातील शेतकरी 26 जूनला सर्व राजभवनांना घेराव घालणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारच्या वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सात महिने पूर्ण होणार आहेत. त्यामुळे आता या प्रश्नी खुद्द राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करून योग्य तो तोडगा काढावा, यासाठी 26 जूनला देशभरातील सर्व राजभवनांना घेराव घालावा. जल, जंगल आणि जमीन वाचवायची असेल तर चोरांविरोधात लढाई, संघर्ष करावा लागेल, असे आवाहन आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी देशभरातील शेतकऱयांना केले आहे.

दिल्लीत केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाबाबत शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये चर्चेच्या फेऱया सुरू असून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. त्याचबरोबर कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाला गती देऊन आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिपैत यांनी घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर, टिपैत यांनी ट्विट करत शनिवार 26 जूनला लोकशाही वाचवा, शेतकरी वाचवा दिवस साजरा केला जाणार असून त्यासाठी देशभरातील सर्व राजभवनांना शेतकऱयांनी घेराव घालावा, असे आवाहन केले आहे.