वडिल मुलीने रचला इतिहास, एकत्र उडविले फायटर जेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय हवाईदलाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद घेण्यासारखी घटना घडली आहे. एका वडिल मुलीने इतिहास रचला आहे. एअर कमोडोर संजय शर्मा आणि त्यांची मुलगी फ्लाईंग ऑफिसर अनन्या शर्मा यांनी फायटर जेटने आकाशात झेप घेतली आहे. भारतीय हवाईदलात अशाप्रकारची पहिल्यांदाच घटना घडली असून एकत्र झेप घेणारी पिता-पुत्रीची ही पहिलीच जोडी ठरली आहे. त्यांचा फोटो सोशल मीडीयावर व्हायरल होत आहेत.

फ्लाइंग ऑफिसर अनन्याने 30 मे 2022 रोजी कर्नाटकाच्या बिदार येथे हॉक -132 विमानाचं उड्डाण भरलं. जिथे अनन्या फायटर एअरक्राफ्टमध्ये पदवी घेण्यापूर्वी तिचे प्रशिक्षण घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हवाईदलात पुर्वीचे असे कोणतेच उदाहरण नाहीय जिथे वडिल आणि मुलगी एकाच मिशनसाठी एकाच फायटर फॉर्मेशनचा भाग होते.

विशेष म्हणजे अनन्या देशातील पहिली महिला फायटर जेट पायलट आहे. फ्लाइंग ऑफिसर अनन्या शर्मा 2016 मध्ये भारतीय हलाईदलात सहभागी झाली. डिसेंबर 2021 मध्ये अनन्याला फायटर पायलट म्हणून प्रमोशन मिळाले आहे. अनन्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बी.टेक केलंय. त्यानंतर तिला भारतीय हवाई दलात प्रशिक्षणासाठी निवड करकण्यात आली आहे. तर अनन्याचे वडिल एअर कमोडोर संजय शर्मा 1989 मध्ये आयएएफच्या फायटर स्ट्रीममध्ये प्रमोशन झाले होते. त्यांना लढाऊ कारवायांचा दांडगा अनुभव असल्याने एअर कमोडोर संजय शर्मा यांनी मिग-21 स्क्वॉड्रनचे फ्रंटलाइन फायटर स्टेशन म्हणून नेतृत्व केले आहे.