भयंकर! पैशाच्या लोभापायी सासऱ्याने सुनेला 80 हजाराला विकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील बाराबंकी गावात अतिशय निंदनीय घटना घडली आहे. पैशाच्या लोभापायी सासऱ्याने स्वत:च्या सूनेलाच विकले. पोलिसांनी या प्रकरणात 8 जणांना अटक केली आहे.

उत्तर प्रदेशातील बाराबंकी गावातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. येथे राहणारे चंद्रराम वर्मा मानवी तस्करी करत होता. एक दिवस या व्यक्तीने आजारी असल्याचे ढोंग करून गाजियाबाद येथे राहणाऱ्या सूनेला त्याच्यावर औषधोपचार करण्याकरिता बोलवून घेतले. सून आल्यानंतर त्याने तिला गुजरातहून आलेल्या 8 जणांना विकले. ही गोष्ट त्याच्या मुलाला कळली तेव्हा त्याने ‘वडिलांनी आपल्या बायकोला गुजरातमध्ये राहणाऱ्या काही व्यक्तिंना विकले’, अशी तक्रार पोलिसांकडे फोनवरून केली.

गुजरातहून आलेले ग्राहक सूनेला घेऊन जाण्याकरिता बाराबंकी रेल्वे स्थानकावर आले होते, पण पोलिसांना तरुणांने फोन करून घडलेल्या घटनेविषयी आधीच सांगितल्याने पोलीस तात्काळ रेल्वे स्थानकावर पोहोचले आणि त्यांनी सूनेला ताब्यात घेतले. तसेच गुजरातहून आलेल्या 8 जणांना अटक केली. पोलिसांनी अटक केलेल्या 8 जणांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे.

आरोपी चंद्रराम वर्मा यांच्या मुलाने केलेल्या तक्रारीमुळे पोलिसांनी आठ जणांना पकडले. यामध्ये आरोपी सासरे आणि रामू गौतम या व्यक्तिविरोधात मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र आरोपी सासरे आणि रामू गौतम पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.