एका महिन्याच्या मुलीवर बलात्कार करून पाय तोडले, नराधम पित्यास 240 वर्षांची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । टेक्सास

टेक्सास येथील वाको भागात एक महिन्याच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिच्या फासळ्या व पाय तोडणाऱ्या नराधम पित्यास येथील न्यायालयाने तब्बल 240 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. पॅट्रीसिओ मॅडिना ( 27) असे त्याचे नाव आहे. तसेच बालिकेवरील अत्याचाराबद्दल पोलिसांना कळवण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी मुलीच्या आईलाही दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लिसा मोन्टोया असे तिचे नाव आहे. दरम्यान पीडित मुलगी व तिच्या इतर दोन भावंडांना एका कुटुंबाने दत्तक घेतले आहे.

पॅट्रीसिओ हा गुन्हेगारी वृत्तीचा असून वॉको भागात पत्नी लिसा व तीन मुलांसह राहत होता. महिन्याभरापूर्वीच त्याच्या पत्नीने एका कन्येला जन्म दिला. तेव्हापासून त्यांच्यातील वाद वाढले होते. याआधीही एका महिलेवर हल्ला केल्याप्रकरणी त्याला शिक्षा झाली होती. लिसाबरोबर वाद झाल्यानंतर तिचा राग तो मुलांवर काढायचा. मार्चमध्येही त्याचे लिसाबरोबर कडाक्याचे भांडण झाले. त्याचा राग त्याने महिन्याभरापूर्वीच जन्माला आलेल्या चिमुरडीवर काढला. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले व तिच्या नाजूक छातीवर जोरदार ठोसा लगावत तिच्या फासळ्या तोडल्या. एवढे करूनही त्याचे मन भरले नाही म्हणून त्याने हाताने तिचे पायही तोडले.

lisa

पण पॅट्रीसिओ मुलीवर एवढा अत्याचार करत असताना लिसाने मात्र मुलीचा बचाव करण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाही. ती शांतपणे सगळे बघत होती. त्याचवेळी पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करून याबद्दल कळवले. त्यानंतर पोलिसांनी पॅट्रीसिओच्या घरी धाव घेतली. पोलीस घरी आले तेव्हा पॅट्रीसिओ व लिसा घरीच होते. पोलिसांनी दोघांना ताबडतोब अटक केली. त्यानंतर पीडित बालिकेसह तिच्या दोन भावंडांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून या खटल्याची सुनावणी सुरू होती. रविवारी न्यायालयाने पॅट्रीसिओला दोषी ठरत 240 वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच बालिकेवरील अत्याचाराबद्दल पोलिसांना कळवण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी लिसाला दोन वर्षाची शिक्षा सुनावली.

दरम्यान, पॅट्रीसिओ व लिसाला शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या मुलांना सरकारी अनाथालयात पाठवण्यात आले होते. पण एका कुटुंबाने या तिनही मुलांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवली. त्यानंतर सर्व आवश्यक त्या कायदेशीर बाबी पूर्ण करून त्यांनी ही तिन्ही मुले दत्तक घेतली आहेत. पीडित बालिकेच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे.