
मुलगी हरवल्याची तक्रार देत पोलीस ठाण्यात आलेल्या दाम्पत्यानेच चाळीस दिवसांच्या चिमुरडीला साडेतीन लाखांत विकल्याचा प्रकार पुण्यातील येरवडा परिसरात उघड झाला आहे. या प्रकरणात खरेदीदार महिलेसह आईवडील आणि एजंट अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
एजंट साहिल अफजल बागवान (वय 27, रा. सातारा), रेश्मा शंकर पानसरे (वय 34, रा. येरवडा), सचिन रामा अवताडे यांच्यासह मुलीचे आई -वडील आणि मुलगी विकत घेणारी संगमनेर येथील महिला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार सचिन गवळी यांनी फिर्याद दिली आहे.
बिबवेवाडी येथील हे दाम्पत्य आहे. संबंधित महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे. दुसऱ्या पतीकडून तिला 26 मे रोजी मुलगी झाली. तिच्या पतीचा मित्र असलेल्या साहिलने आणि त्यांनी ही मुलगी विकण्याचे ठरवले. साहिलच्या ओळखीची महिला रेश्मा पानसरे मूलबाळ नसलेल्या महिलांच्या संपर्कात असल्याचे त्याला समजले. तिच्या माध्यमातून संगमनेर येथील रहिवासी असलेल्या महिलेसोबत साडेतीन लाखांत व्यवहार ठरविला होता
























































