
सामना ऑनलाईन । मुंबई
फ़ौडा या इस्राईल पॅलेस्टाईन संघर्षावर आधारित वेबसीरीजच्या तिसर्या पर्वाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आधीचे दोन पर्व लोकप्रिय झाल्यानंतर निर्मात्यांनी तिसर्या पर्वाची घोषणा केले होती. आता या तिसर्या पर्वाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
इस्राईल पॅलेस्टाईन संघर्षावर आधारिक फ़ौडा या नेटफ्लिक्सवरी वेबसीरीजच्या तिसर्या पर्वाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ही वेब सीरीज हिब्रू, अरबी आणि इंग्रजी भाषेत आहे. नेटफ्लिकपूर्वी इस्राएलच्या येस टीव्ही. या ऑनलाईन स्ट्रीमींग वेबसाईटवर ही मालिका प्रदर्शित झाली होती. त्यानंतर नेटफ्लिकवर ही मालिका आल्याने जगातील प्रेक्षकांनी या मालिकाची प्रशंसा केली. आता या मालिकेचे तिसरे पर्वाचा ट्रेलर जरी प्रदर्शित झाला असला तरी नेटफ्लिक्सच्या प्रेक्षकांना यासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे. येस टीव्ही वरून आधी हे तिसरे पर्व प्रसारित होईल.त्यानंतर दोन तीन महिन्यांच्या कालावधीनंतर नेटफ्लिक्सच्या प्रेक्षकांच्या भेटीला ही मालिका येणार आहे.
नवीन पर्वात डोरोन आणि त्याची टीम गाझामध्ये घुसून हमास या पॅलेस्टाईन दहशतवाद्यांना लक्ष्य करताना दिसत आहे. म्हणून आधीच्या पर्वापेक्षा तिसरे पर्व अजूनच रोचक होईल असे दिसते.
























































