#फायद्याचंबोला! चांदीची भांडी घरच्या घरी कशी उजळाल? आहे सोपे उपाय

silver-thumb

चार्तुर्मास सुरू झाला की व्रतवैकल्य, सण-उत्सवाला सुरुवात होते. अशा वेळी चांदीच्या भांड्यांचा वापर देवपूजेसाठी, नैवेद्यासाठी केला जातो. ही भांडी उजळवण्यासाठी अनेकादा भांडी सोनाराकडे दिल्या जातात. मात्र काही घरगुती उपाय आहेत ज्याने भांडी घराच्या घरी उजळवू शकतो.

दात घासण्यासाठी वापरात येणारी कोलगेट पेस्ट आणून ती स्वतंत्र ठेवत चांदीच्या भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरावी. पेस्ट चांदीच्या भांड्यांना वापरून त्याने घासल्याने चांदीचे भांड स्वच्छ होते.


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

बेकिंग सोडा आणि अॅल्युमिनिअम फॉईलच्या उकळत्या मिश्रणात चांदीची भांडी ठेवल्यास ती काही वेळात उजळून निघतात. वातावरणाने भांड्यांवर पडलेले काळे डागही निघून जातात.

चांदीची भांडी साफ करण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या पावडरचा देखील चांगला उपयोग होते. मात्र यात धातूची झिज होण्याची भिती असल्याने अनेकजण घरगुती उपाय करतात.

आपली प्रतिक्रिया द्या