
गेली दोन वर्षे स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत असलेली 2017 ची फेमिना मिस इंडिया त्रिपुरा रिंकी चकमा हिचे वयाच्या 29 व्या वर्षी निधन झाले आहे. ती एक मॉडेल होती. तिच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. मात्र त्यानंतरही घातक कर्करोगाच्या पेशी फुफ्फुस आणि मेंदूमध्ये पसरल्या होत्या, त्यामुळे मेंदूमध्ये ट्यूमर तयार झाला होता.
रिंकी चकमा हिची तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती. पैशांची चणचण असल्यानेही ती केमोथेरपी सातत्याने घेऊ शकलेली नाही. त्यासाठी काही आठवड्यापूर्वी तिने मदतीसाठी आवाहन केले होते. मात्र 22 फेब्रुवारीला तिला दिल्लीच्या मॅक्स रुग्णालय साकेतमध्ये अॅडमिट केले होते. तिथे काहीदिवस तिला अतिदक्षता विभागात वेंटीलेटरवर राहिल्यानंतर आज तिचा मृत्यू झाला.






























































