
एकेका गोलसाठी ब्राझील आणि स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेले गोलयुद्ध 83 मिनिटापर्यंत गोलाविनाच खेळले गेले. अखेर ब्राझीलियन आक्रमकांनी स्विस गोलपोस्टला घेरून केलेला हल्ला कासेमिरोच्या जोरदार किकने यशस्वी करून दाखविला आणि तोच ब्राझीलच्या विजयाचा हीरो ठरला. सलग दुसऱया विजयासह ब्राझीलने फिफा वर्ल्डकपच्या जी गटातून बाद फेरीत धडक मारली. आता या गटातून बाद फेरीत धडक मारणारा दुसरा संघ 3 जानेवारीला मध्यरात्री ठरेल. आतापर्यंत ब्राझील आणि फ्रान्स हे दोनच संघ बाद फेरीत पोहोचले आहेत.
नेमारशिवाय खेळणाऱया ब्राझीलने आज प्रारंभापासून स्विसच्या गोलजाळ्यात चेंडू नेत गोल करण्याचे प्रयत्न केले. ब्राझीलच्या समोर स्वित्झर्लंड कुठेही कमी भासत नव्हता. ब्राझीलकडे चेंडूंचा ताबा जास्त असला तरी त्यांचे आक्रमण स्विस बचावफळी वारंवार परतावून लावत होती. दोघांमधला संघर्ष पहिल्या हाफ टाइमपर्यंत गोलशून्य बरोबरीतच होता. ब्राझीलकडे एकापेक्षा एक फॉरवर्ड होते, पण स्विस बचावफळी त्यांना यशस्वी होऊ देत नव्हती. दुसऱया सत्रातही गोलासाठी दोन्ही संघाची झटापट पाहाण्यासारखी होती. 80 व्या मिनिटाला ब्राझीलने आपल्या गुणांचे खाते उघडले होते, पण रेफ्रीजनी या गोलला ऑफसाइड जाहीर केले आणि ब्राझीलच्या गोटात नाराजी पसरली. पण त्यानंतर गुणांचे खाते उघडायला ब्राझीलने फार वेळ घेतला नाही आणि कासेमिरोने 83 व्या मिनिटाला अप्रतिम निर्णायक गोल केला.
फिफा वर्ल्ड कप गुणतालिका
गट ई
संघ सा. वि. ड्रॉ प. गुण
स्पेन 2 1 1 0 4
जपान 2 1 0 1 3
कोस्टारिका 2 1 0 1 3
जर्मनी 2 0 1 1 1
गट जी
ब्राझील 2 2 0 0 6
स्वित्झर्लंड 2 1 0 1 3
पॅमेरून 2 0 1 1 1
सर्बिया 2 0 1 1 1
गट एच
पोर्तुगाल 1 1 0 0 3
घाना 2 1 0 1 3
उरुग्वे 1 0 1 0 1
द. कोरिया 2 0 1 1 1
(टीप – सा – सामने, वि – विजय, प – पराभव) ही गुणतालिका ब्राझील-स्वित्झर्लंडपर्यंतची आहे.