६० वर्षांनंतर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,निझ्नी नोवगोरोड

स्वीडनच्या फुटबॉल संघाने सोमवारी फिफा वर्ल्ड कपमध्ये करामत करून दाखवली. कर्णधार आंद्रेस ग्रॅनक्विस्टने ६५व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून स्वीडनला १९५८ सालानंतर वर्ल्ड कपमधील सलामीचा सामना जिंकून दिला. स्वीडनने एफ गटातील लढतीत आशिया खंडातील दक्षिण कोरियाला १-० अशा फरकाने हरवत महत्त्वाच्या तीन गुणांची कमाई केली. आंद्रेस ग्रॅनक्विस्ट या लढतीचा सामनावीर ठरला.

रशियात सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये एफ गटात कमालीची चुरस दिसून येत आहे. मेक्सिकोने रविवारी रात्री गतविजेत्या जर्मनीला हरवून धक्कादायक निकालाची नोंद केल्यानंतर स्वीडनने सोमवारी दक्षिण कोरियाला हरवून या गटातून आगेकूच करण्यासाठी दमदार पाऊल उचलले आहे. जर्मनी व दक्षिण कोरियासाठी आता पुढील दोन्ही सामने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

व्हीएआर अन् गोल

दक्षिण कोरियाच्या किम वूने स्वीडनच्या व्हिक्टर क्लेसनला बॉक्समध्ये पाडल्यानंतर व्हीडीओ असिस्टंट रेफ्री सिस्टीमच्या (व्हीएआर) सहाय्याने स्वीडनला पेनल्टी देण्यात आली. त्यानंतर ३३ वर्षीय आंद्रेस ग्रॅनक्विस्टने ही संधी वाया न घालवता दमदार गोल केला.

sivdan