कुणकी येथे दोन गटात हाणामारी; 10 जणांवर गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जळकोट तालुक्यातील मौजे कुणकी येथे दोन गटात काठीने, कत्तीने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन दोन्ही गटातील 10 जणांवर जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लक्ष्मण पंढरी केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, मारोती व्यंकटी केंद्रे आणि इतर पाचजणांनी संगनमत करून तक्रारदार आणि त्यांच्या भावाला कोर्टात दाखल केलेला खटला काढून घेण्याच्या कारणावरुन शिवीगाळ केली. लाथाबुक्यांनी, दगडाने, काठीने मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मारोती व्यंकटी केंद्रे यांच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मारोती व्यंकटराव केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लक्ष्मण पंढरी केंद्रे आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील केसचा राग मनात धरुन शिवीगाळ करून काठीने व कत्तीने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.