सुपारी देण्याच्या किरकोळ कारणावरुन चाकूने हल्ला

459

स्वतः जवळची सुपारी दे, अशी मागणी करत किरकोळ कारणावरून शिवीगाळ करुन चाकूने हल्ला केल्याची घटना लातूरच्या औसा तालूक्यातील मसलगा खुर्द येथे घडली. या हल्ल्याप्रकरणी दत्तू मारोती पवार (रा. मसलगा खुर्द) याने किल्लारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गावातील अशोक भागोजी पवार याच्या आईच्या गोडजेवणाचा कार्यक्रम होता. त्यासाठी आपण त्या ठिकाणी जेवणासाठी गेलो होतो. जेवण करुन पानसुपारी खात असताना अशोक पवार याने आपल्यकडे सुपारी मागितली. त्याला सुपारी दिल्यावर त्याने तुझ्याजवळची सुपारी दे अशी कुरापत काढत वादावा सुरुवात केली तसेच शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर चाकूने आपल्या तोंडावर, हनुवटी आणि गालावर वार करुन जखमी केले. तसेच आपल्याला ठार मारण्याची धमकी दिली, असे दत्ते पवार याने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात अशोक पवार याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या