मराठा आंदोलकांत फूट!

मराठा आंदोलकांच्या रेटय़ानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा कायदा विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून पारीत केला. याला 24 तास होत नाहीत तोच मराठा आंदोलकांत फूट पडल्याचे दिसून येत असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनोज जरांगे यांचे अत्यंत जवळचे सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे हा हेकेखोर माणूस असून रोज पलटी मारतो. त्यांची भूमिका पारदर्शक नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यावर जरांगे-पाटील यांनी बारस्कर हा सरकारी ट्रप असल्याचा आरोप केला असून हा आंदोलन संपविण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे.