
आर्थिक वर्ष 2022-23 साठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची शेवटची डेडलाईन 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहे. आधी ही डेडलाईन 31 जुलै 2023 होती, परंतु दंडासह 31 डिसेंबर 2023 पर्यंत आयकर रिटर्न फाईल करता येऊ शकते. जे करदाते आहेत त्यांना प्रत्येक वर्षी टॅक्स रिटर्न फाईल करणे बंधनकारक असते. पाच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न करदात्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागेल. पाच लाख रुपयांपेक्षा जास्त करदात्यांना पाच हजार रुपयांपेक्षा जास्त दंड भरून रिटर्न फाईल करता येऊ शकते.






























































