हेअरस्टाईलिस्ट जावेद हबीब याच्याविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिलेची केशरचना करताना केसात थुंकल्याप्रकरणी हेअरस्टाईलिस्ट जावेद हबीब याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 3 जानेवारीला हबीब यांनी कार्यशाळेत महिलेची केशरचना करताना थुंकीचा वापर केला. पाणी संपले तर पर्यायी व्यवस्था म्हणून तोंडातील लाळेचा वापर करावा, असे सांगत चक्क केशरचना करून घेणाऱ्या महिलेच्या केसांत ते थुंकले होते. या महिलेने, पूजा गुप्ता हिनेच हबीब यांच्याविरोधात हल्ला करणे, अपमानास्पद वागणूक देणे आणि साथ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला. ही घटना गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हबीब यांच्याविरोधात हिंदू संघटनांनी निदर्शने करत निषेध व्यक्त केला.