क्रेडिट कार्ड नावाचा गुप्त शत्रू

>> चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार

कळत-नकळत वाढलेल्या ऐहिक गरजांपोटी आपल्या बजेटची एैशीतैशी करणारा क्रेडिट कार्ड नावाचा क़र्जरुपी राक्षस खिशातून किंवा पर्समधून आपल्या सोबत फिरत आहे. त्याच्यामुळे खिशाला परवडत नसताही व बजेटमध्ये बसत नसतानाही आपण खरेदी करत सुटतो.

एका ताज्या आकडेवारीनुसार, 2023 आर्थिक वर्षात 2.9 अब्ज व्यवहारामध्ये 14 लाख करोड रुपये हिंदुस्थानी चलनाची उलाढाल झाली आहे.

आपल्याकडे जेव्हा अकाऊंटला पैसे असतात तेव्हा आपण डेबिट कार्ड वापरतो. याला एटीएम असे म्हणतो. म्हणजे ए- असतील टी – तर एम – मिळतील. म्हणजे अकाऊंटला पैसे असतील तरच हे कार्ड वापरता येईल. क्रेडिट कार्ड अगदी याच्या उलट. ते म्हणजे एनटीएम…म्हणजे एन- नसतील, टी- तरी, एम – मिळतील. म्हणजे अकाऊंटला पैसे नसतील तरीही हे कार्ड वापरता येईल. म्हणजे या कार्डावर खरेदी करणे म्हणजे एक प्रकारे कर्जच नाही का? बरे 18 ते 24 टक्के असलेल्या व्याजाचा दर किंवा त्यावरील दंडाचा विचार केलात तर पठाणी व्याजाची आठवण येते. तुम्ही वेळेवर क्रेडिट कार्डची बिले भरली नाही तर क्रेडिट कार्ड देणाऱया कंपन्यांची चंगळच. शिवाय वेळेवर क्रेडिट कार्डचे पेमेंट नाही केले तर सिबिल स्कोर खाली गेलाच समजा. मिनिमम डय़ू फक्त भरत राहिलो तर बाकीच्या रकमेवर व्याज व दंड वाढत राहते हे कित्येकांना माहीतही नसते आणि अज्ञानापोटी आज कित्येक जण क्रेडिट कार्डच्या चक्रात गुरफटले आहेत. मला आवडणारी गोष्ट माझ्याकडे आता पैसे नसताना मला आताच घ्यायची आहे या हव्यासापोटी नकळत कर्ज वाढवून आपल्या बजेटचा बट्टय़ाबोळ करण्यात काय अर्थ आहे? एकदा का क्रेडिट कार्डची सवय लागली की, विनाकारण खरेदी करायचे व्यसन लागून जाते. त्यामुळे आपल्याला जेव्हा पूर्ण खात्री असते की, क्रेडिट कार्ड वर मारलेले पेमेंट त्याच्या डय़ू डेटच्या अगोदर मला भरता येणार आहे त्याच वेळी क्रेडिट कार्डचा वापर करावा, अन्यथा हा वापर आपल्याला कर्जाच्या विळख्यात बांधून टाकतो.

याचबरोबर क्रेडिट कार्डचा स्मार्ट वापर करून स्वतःचा फायदा करून घेणारे लोकही अस्तित्वात आहेत. हे लोक आपली सर्व पेमेंट क्रेडिट कार्डवर करतात. अगदी पेमेंट डय़ू होण्याच्या आधी आपला क्रेडिट कार्डचा हप्ता भरतात व क्रेडिट कार्डचे पॉइंट्स मिळवतात. या पॉइंट्समुळे त्यांना क्रेडिट कार्ड वापरल्यामुळे आर्थिक फायदादेखील होतो. क्रेडिट कार्डचा आपण स्मार्ट वापर केलात नक्कीच फायदा होईल.

काय काळजी घ्याल
 योग्य पंपनीचे व्रेडिट कार्ड निवडा. पैसे भरायला उशीर झाला तर किती व्याजदर लागणार याची खातरजमा करून घ्या.
 व्रेडिट कार्डची मर्यादा किती आहे हे जाणून घ्या.
 व्रेडिट कार्डचा वापर करताना आपले स्वतःचे पैसे डय़ू डेटच्या अगोदर पेमेंट करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत का याची खात्री बाळगा.
 मिनिमम डय़ू न भरता डय़ू झालेली पूर्ण रक्कम भरून व्याज व दंड टाळा.
 प्रमोशनल ऑफर्स आणि व्रेडिट पॉइंट यांचा त्याची व्हॅलिडिटी संपण्याआधी वापर करा, अन्यथा ही संधी वाया जाईल.
 बिलिंग सायकल जाणून घेऊन खरेदी करा. म्हणजे कुठलेही व्याज न लागता जास्त कालावधीसाठी बिनव्याजी पैसे आपण वापरू शकता.

[email protected]