तरुणांच्या शुक्राणूवर होतोय परिणाम; वाचा 56 हजार मिळणार असूनही डोनर का मिळत नाही

धुम्रपान, दारु पिणे, रात्री उशिरापर्यंत जागणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे पुरुषांच्या शुक्राणूची गुणवत्ता ढासळत आहे. त्यामुळे चीनमध्ये चांगल्या प्रतीचे शुक्राणू दाता मिळेनासे झाल्याने त्याची मागणी वाढली आहे. याबाबत चीनच्या एका स्पर्म बॅंकेने सोशल मीडियावर चांगल्या प्रतीचा शुक्राणू दाता शोधणाऱ्यास 56 हजार रुपये देणार असल्याचे आवाहन केले आहे.

झेजियांग ह्युमन स्पर्म बँक गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सातत्याने शुक्राणू दान करण्याबाबत जनजागृती करत आहेत. दात्यांचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या जाहिरातींचीही मदत घेतली जात आहे. स्पर्म बॅंकेने आपल्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की तुमच्या चांगुलपणाची आम्ही आशा करतो, तुमचे समर्पण भविष्यासाठी उपयुक्त आहे. आम्ही तुम्हाला सामाजिक सेवा आणि शुक्राणू दान करण्यासाठी आमंत्रित करित आहोत असे लिहित पुरुषांना शुक्राणू दान करण्याचे आवाहन केले आहे. याआधीच्या पोस्टमध्ये स्पर्म बॅंकेने लिहिले होते की शुक्राणू दान करणे हे रक्तदानासारखेच आहे. हे मानवतेसाठी केलेले चांगले काम आहे. आम्ही चांगल्या प्रतीचे शुक्राणू दाता शोधणाऱ्यास 56 हजार रुपये देऊ असेही त्यांनी आवाहन केले आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या स्पर्म बॅंकेच्या या पोस्टची काहींनी खिल्ली उडवली. यात एका युजरने लिहिले मला डोळ्यांनी कमी दिसते, मी वयस्कर झालो. मला आशा आहे की मी यासाठी पात्र ठरणार नाही. तर एका युजरने जर मी एवढे शुक्राणू दान केले तर देशभरात माझी कितीतरी मुलं फिरायला लागतील की ज्यांच्याबाबत मला माहितीही पडणार नाही.

झेयियांग ह्युमन स्पर्म बॅंकेचे संचालक शेंग हुईकियांग यांनी स्थानिक वृत्तपत्राला माहिती देताना सांगितले की स्पर्म बॅंकेला गेल्या काही वर्षपासून शुक्राणू दात्यांचा तुटवडा भासत आहे. आपल्याकडे शुक्राणू दानासाठी अनेकजण संपर्क साधतात मात्र त्यातील काहीजणच त्यासाठी पात्र ठरतात. चीनमध्ये शुक्राणू दात्यासाठी कडक नियम आहेत. ज्यात 1500 दात्यांमधून केवळ 400 दातेच पात्र ठरतात.

शेंग यांचे म्हणणे आहे की चुकीच्या सवयींमुळे पुरुषांच्या शुक्राणुची गुणवत्ता ढासळत आहे. झेजियांग ह्युमन स्पर्म बॅंक यांच्या अधिकृत संकेतस्थळानुसार शुक्राणु दात्यांसाठी काही नियम दिले आहेत. त्यात शुक्राणु दाते 20 ते 40 वयोगटातील असायला हवे. त्यांच्याकडे किमान एक पदव्युत्तर पदवी असायला हवी आणि तो कमीत कमी 5.4 फुटाचा असायला हवा असे दिले आहे. शेंग पुढे म्हणतात की काही वर्षांपूर्वी बॅंकेने टक्कल असलेल्या लोकांनागी पात्र ठरवले नव्हते. शुक्राणु दाता निवडताना तो सुंदर असायला हवा अशी अट आहे.

आपली प्रतिक्रिया द्या