
सामना प्रतिनिधी । पुणे
नौदलात मोठ्या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याला पॉर्न बघण्याचे वेड लागले. त्यातून त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी आली. न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज टाकला तरीही त्याचे वेड कमी झाले नाही. त्याचे पत्नीचे तसेच नात्यातील महिलांचे, लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींचे फोटो मॉर्फ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
37 वर्षीय महिलेने दिल्लीत राहणाऱ्या 39 वर्षीय नौदल कमांडवरवर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला ही लष्करातून निवृत्त झाली आहे. तिचा पती नौदलामध्ये कमांडर आहे. तिच्या पतीला पॉर्न बघण्याची सवय लागली. यातून त्यांचे खटके उडण्यास सुरुवात झाली. अनेकदा समजावूनही त्याचे पॉर्न बघण्याचे वेड कमी झाले नाही. अखेर या महिलेने दिल्ली सोडून मुलांसह पुण्यात आई-वडिलांकडे राहण्यासाठी आली. घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला आहे.
नौदल कमांडरने फिर्यादी यांचे नग्न फोटो काढले होते. तसेच, त्याच्या लॅपटॉप, मोबाईलमध्ये फिर्यादीचे इतर फोटो, त्याच्या नात्यातील महिला आणि नौदलातील अधिकाऱ्यांच्या महिलांचे फोटो अॅपवरून डाऊनलोड केले. ते मॉर्फ करून त्यांना अश्लिल बनवून ते फोटो गुगल अकाऊंटवर सेव्ह करून ठेवले. फिर्यादी यांना हा प्रकार कळाल्यानंतर प्रचंड धक्का बसला. त्यांनी याबाबत कोंढवा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार नौदल कमांडरवर गुन्हा दाखल केला आहे.
























































