वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी बीएसएफच्या दोन जवानांसह पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । औसा

तालुक्यातील फत्तेपूर शिवारात शेतीच्या वादातून वृद्ध व्यक्तीला जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात बीएसएफच्या दोन जवानांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

औसा तालुक्यातील फत्तेपूर येथील सदाशिव माळी यांच्यासह त्यांच्या भावकीमध्ये गेल्या काही वर्षापासून शेतीचा वाद सुरू आहे. याच वादातून २४ जुलै  रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास जनावरे चारणार्‍या सदाशिव विश्वनाथ माळी यांना काहीजणांनी दोरीने बांधून लोखंडी रॉड, काठी, दगडाने जबर मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी सदाशिव माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन औसा पोलीस ठाण्यात सचिन सुरेश माळी, प्रवीण सुरेश माळी या दोन जवानांसह सुरेश निवृत्ती माळी, वैभव विजयकुमार माळी, विजयकुमार निवृत्ती माळी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.