कोलकात्यात इमारतीला भीषण आग, 9 जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधीच्या कोलकात्यामधील एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.


कोलकात्याच्या स्ट्रॅंडर मार्गावर असलेल्या न्यु कोयलाघाट इमारतीच्या 13 मजल्यावर आग लागली. या आगीत अग्निशम दलाच्या जवानासह 9 जणांचा मृत्यू झाला आहे याच इमारतीत पूर्व रेल्वेचे कार्यालय आहे.

आग विझवण्यासाठी या भागातील वीज बंद करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेची तिकीट बुकिंग सेवा प्रभावित झाली आहे.
या भागत आग लागल्याने कोलकाता पॅसेंजर रिझर्व्हेशन सर्व्हिसचा सर्वर ठप्प झाला आहे. आणि सर्वर ठप्प झाल्याने तिकीट बुकिंग सेवा प्रभावित झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच नुकसान भरपाई म्हणून मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये आणि घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचे जाहीर केले आहे.


रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या घटनेप्रति शोक व्यक्त केल आहे. या घटनेत चार अग्निशमन दलाचे जवान, दोन रेल्वे कर्मचारी आणि एक पोलीस अधिकार्याशचा मृत्यू झाला आहे. रेल्वे मंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्वतोपरी सहाय्य केले जाईल असे आश्वासन दिले आहे. तसेच या घटनेची पूर्ण चौकशी केली जाईल असेही म्हटले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या