पेण येथील जेएसडब्लू कंपनीत आग, एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेण डोळवी येथील जेएसडब्लू कंपनीच्या सेंटर टू ऑपरेशन प्लाटमध्ये लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.  त्यांना ऐरोली येथे बर्निंग सेंटरमध्ये ठेवण्यात आलेले आहे. भरत साहू (छत्तीसगड) असे मयत कर्मचाऱ्यांचे नाव असून परेश असे जखमींमधील एकाचे नाव आहे.

जेएसडब्लू कंपनीत रात्री आठच्या सुमारास भरत साहू, परेश आणि अजून एक कर्मचारी सेंटर टू ऑपरेशन प्लाटमध्ये मटेरियल मिक्सर मध्ये टाकण्याचे काम करीत होते. त्यावेळी अचानक लागलेल्या आगीचा भडका होऊन अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये भरत साहू हा आगीच्या भक्ष्यस्थानी येऊन जागीच ठार झाला आहे. तर परेश आणि दुसरा कर्मचारी हे गंभीररीत्या भाजले आहेत. भरत साहू हा ऑपरेटर असून टीपीएस कंपनीचा कर्मचारी आहे. परेश हा जेएसडब्लूचा कर्मचारी असून दुसरा कर्मचारी हा कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी आहे.