धारावीच्या झोपडपट्टीत आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

धारावी येथील अण्णानगर झोपडपट्टीत सकाळी अचानक आग लागली. या आगीत तीन झोपडय़ांचे नुकसान झाले. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. धारावी, ९० फिट रोड अण्णानगर झोपडपट्टीत रहिवासी झोपलेले असतानाच सकाळी ६ वाजताच्या सुमारास एका झोपडीला अचानक आग लागली. यामुळे रहिवाशांची धावपळ उडाली. काही वेळातच लगतच्या तीन झोपडय़ांनाही आगीने वेढले.

दरम्यान, अग्निशमन दलाला ही माहिती मिळताच तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू झाल्याने पुढील अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी ४ फायर इंजिन, २ कॉटर टँकर यांच्या सहाय्याने सकाळी ८.३८ काजताच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. ही आग कशामुळे लागली याचा तपास सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.