
ऑगस्ट महिन्यात आकाशात सर्वात मोठा उल्का वर्षाव होणार आहे. येत्या 11, 12 आणि 13 ऑगस्ट रोजी मध्यरात्री ते पहाटेपर्यंत पर्सिड्स उल्का बरसणार आहेत. या तीन दिवसांत आकाशात ताऱ्यांची आतषबाजी होईल. यानंतर असे दृश्य 133 वर्षांनी दिसेल.
सूर्याभोवती फिरणारा स्विफ्ट टटल धूमकेतू सध्या पृथ्वीजवळून जात आहे. हा धूमकेतू पर्सिड उल्का शॉवरचा जनक आहे. पृथ्वी स्विफ्ट टटल धूमकेतूच्या कक्षीय मार्गाच्या एकदम जवळून भ्रमण करत आहे. 11 ते 13 ऑगस्टला पृथ्वी या धूमकेतूच्या ढिगाऱ्यातून जाणार आहे. धूमकेतूचे तुकडे पृथ्वीच्या वरच्या वातावरणात घुसतात. धूमकेतूच्या तुकडय़ांचा वेग 2 लाख 10 हजार कि.मी. प्रतितास असतो. धूमकेतूचे तुकडे रात्री वेगाने फिरणाऱ्या पर्सिड्स उल्कांसह प्रकाशमान होतात. उल्का वर्षावामुळे धूमकेतूच्या ढिगाऱ्यातील तुकडे चकमतील आणि आकाशात रोषणाई दिसेल. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पृथ्वीच्या कोणत्याही भागात उल्का वर्षाव दिसेल. उत्तर ध्रुवावर सर्वेत्तम शॉवर वर्षाव बघायला मिळेल. याचे लाइव्ह स्ट्रिमिंग नासातर्फे केले जाणार आहे.



























































