
विजय जोशी | नांदेड
शहराच्या हनुमान टेकडी भागात आशिष पाटनी हेे व्यापारी आपले दुकान बंद करून घरी जातं असताना हनुमान टेकडी परिसरात अज्ञात 2 इसम मोटार सायकलवर आले त्यांनी गोळीबार केला. त्यांनी 3 गोळ्या झाडल्या गोळ्या पायावर गोळ्या लागल्या. त्यांना यशोसाई रुग्णालय येथे दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक घटना स्थळी दाखल झाले आहेत. शहरात सर्वत्र नाका बंदी करण्यात आली आहे. गेल्या 2 महिन्यात अशी दुसरी घटना आहे.


























































