
सामना प्रतिनिधी । मुंबई
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानंतरचे अत्यंत महत्त्वाचे असे पहिले ‘क्रिटिक्स चॉईस फिल्म ऍवॉर्ड’ येत्या 21 एप्रिल रोजी घोषित होणार आहेत. आठ भाषांसाठी हे पुरस्कार देण्यात येणार असून त्याची नामांकन यादी अभिनेत्री विद्या बालन आणि निर्माती- दिगदिर्शिका झोया अख्तर यांनी आज जाहीर केली. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटांचे नामांकन अंधाधुन, बधाई हो, ऑक्टोबर राझी, तुंबाड यांना मिळाले आहे, तर मराठी श्रेणीत लेथ जोशी, नाळ आणि रेडू हे तीन चित्रपट समीक्षकांच्या पसंतीला उतरले आहेत.
दि फिल्म क्रिटीक्स गिल्ड आणि मोशन कंटेंट ग्रुप यांच्यावतीने क्रिटिक्स चॉईस फिल्म ऍवॉर्ड दिले जाणार आहेत. हिंदीसह मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड, तामीळ, तेलगू, मल्याळम या प्रादेशिक भाषांतील चित्रपटांची निवड झाली आहे. हा सोहळा बालगंधर्व रंगमंदिर, वांद्रे येथील अभिनेत्री नेहा धुपिया हिच्या उपस्थितीत 21 एप्रिल रोजी पार पडेल.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : गीतांजली राव (ऑक्टोबर), रसिका दुग्गल (मंटो), सुलेखा सिकी (बधाई हो), स्वरा भास्कर (विरे दी वेडिंग), यामिनी दास (सुईधागा)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : अभिषेक बच्चन (मनमर्जिया), जयदीप अलहावत (राझी), मनोज पाहवा, (मुल्क), पंकज त्रिपाठी (स्त्री), विकी कौशल (संजू)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : आलिया भट (राझी), अनुष्का शर्मा (परी), नीना गुप्ता (बधाई हो), तापसी (मनमर्जिया), तब्बू (अंधाधुन)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : आयुष्यमान खुराणा (अंधाधुन), गजराज राव (बधाई हो), रणबीर कपूर (संजू), रणवीर सिंग (पद्मावत), विनीत कुमार सिंग (मुक्काबाज)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : अमित शर्मा (बधाई हो), आदेश प्रसाद आणि राही अनिल बर्वे (तुंबाड), मेघना गुलजार (राझी), सुजित सरकार (ऑक्टोबर), श्रीराम राघवन (अंधाधुन)



























































