‘तराट’ चित्रपटाचा हटके फर्स्ट लूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हटके कथा आणि तितक्याच ताकदीची मांडणी या दोन गोष्टींच्या जोरावर आपलं वेगळंपण सिद्ध करणारा आणखी एक मराठी चित्रपट लवकरच येऊ घातलाय. ‘तराट’ नाकाप्रमाणेच वेगळेपण जपणारा हा मराठी चित्रपट रवी वाव्होळे आणि सागर भंडारे यांनी दिग्दर्शित केला आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर निर्माते सागर भंडारे यांनी आपल्या चित्रपटाची पहिली झलक खास रसिकांसाठी घेऊन आले आहेत. वृंदावन एन्टरटेनमेन्ट ऍण्ड फिल्म्स निर्मित ‘तराट’ची कथा रंगीलगावामध्ये घडते. पाच मित्रांच्या उनाडक्यांच्या अनुषंगाने खुलणारा ‘तराट’ हा चित्रपट प्रेक्षकांना आपल्या तरुण वयातील खोडसाळ आठवणींना उजाळा देईल असा आहे. वृंदावन एंटरटेनमेंट ऍण्ड फिल्म प्रेसेंट्स तराट एक नवाकोरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहोत.

रॉयल स्टॅग लघुपट महोत्सवात 4 लघुपट

रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स प्रख्यात दिग्दर्शकांचे चार प्रभावी लघुपट प्रदर्शित करणार आहेत. शिवाय लघुपटानंतर झालेल्या संभाषणाच्या सत्रात लघुपटकर्ते त्यांच्या कथा कथनाच्या कलेविषयी प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. यंदाही रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स एक स्पर्धा घेत आहे आणि पहिले दहा सर्वोत्तम लघुपट महोत्सवात प्रदर्शित केले जातील. मामीमध्ये प्रदर्शित करण्यासाठी पहिले दहा लघुपट निवडणाऱ्या परीक्षक मंडळामध्ये गेल्या काही वर्षांत समीक्षकांनी नावाजलेल्या राधिका आपटे, राजकुमार राव, सृष्टी बहल, यामी गौतम आणि अशा आणखी अनेक व्यक्तींचा समावेश होता. यंदा या परीक्षकांमध्ये विजय वर्मा या लोकप्रिय अभिनेत्याचा समावेश करण्यात आला आहे. पर्नेद रिकार्ड इंडियाचे प्रमुख मार्केटिंग अधिकारी कार्तिक मोहिंद्रा याबद्दल म्हणाले, ‘हिंदुस्थानातील लघुपट उद्योग सध्या रोमांचक कालखंडातून जात आहे. तसेच प्रेक्षकांच्या सवयी उक्रांत होत असल्याने त्यात लक्षणीयरीत्या वाढ होत आहे. आमचे रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स हे व्यासपीठ हा बदल घडवून आणण्यामध्ये आघाडीवर आहे.