मच्छीमारांनी तातडीने परत यावे, प्रशासनाची सूचना

1361

अरबी समुद्रात गेले आठ दिवस घोंगवत असलेले ‘महा’ चक्री वादळ गुजरात किनारपट्टीवर धडकण्याच्या स्थितीत आहे. वादळाचा वेग काहीसा कमी झाला असला तरी सुरक्षा यंत्रणा सावध व सक्रिय आहेत.

वादळाचा परिणाम महाराष्ट्र कोकण किनारपट्टीवर जाणवणार आहे. तरी 8 नोव्हेंबर पर्यंत तरी मच्छिमार बांधवांनी मासेमारी करीता समुद्रात जाऊ नये, जे मासेमार समुद्रात गेले आहेत त्यांनी तातडीने परत यावे. मासेमारांनी परत येताना जवळच्या बंदराचा आसरा घ्यावा. असे आवाहन मुख्य सचिव अजोय मेहता यांनी केले आहे. हा संदेश सिंधुदुर्ग पोलिसांनी मत्स्य प्रशासनासह किनारपट्टी भागात दिला आहे.तर मत्स्य महाराष्ट्र मत्स्य विभागानेही सवधतेचा इशारा दिला आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत.

कोकणातील सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सध्य स्थितीत वादळाचा परिणाम जाणवत नसला तरी मासेमारी बोटी समुद्रात स्थिरावल्या आहेत. मात्र वादळामुळे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

15 दिवसापूर्वी आलेल्या क्यार वादळाने मोठे नुकसान केले असताना आता महा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्याच्या स्थितीत आहे. या वादळांचा सर्वाधिक परिणाम मच्छिमार बांधवाना झाला आहे. तर वादळात कोसळणाऱ्या अवकाळी स्वरूपातील पावसाने महाराष्ट्रात सर्वत्र शेतकरी वर्गाचेही मोठे नुकसान झाले आहे.

तिसरे वादळ ‘बुलबुल’

एकूणच अरबी समुद्रातील ‘क्यार’ व ‘महा’ ही चक्री वादळे असताना बंगालच्या उपसागरात ‘बुलबुल’ हे चक्री वादळ घोंगवत आहे. त्याचा परिणाम आंध्रप्रदेश व उडीसा किनारपट्टीवर जाणवण्याची

शक्यता आहे. तर या वादळाच्या परिणामामुळे महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. सद्य स्थितीत हे वादळ खोल समुद्रात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या