
सामना ऑनलाईन । मुंबई
वस्तू व सेवा कराची (जीएसटी) पूर्वलक्षीप्रभावाने म्हणजेच जुलै 2017 पासून 5 टक्के दराने वसुली करण्याच्या आदेशाविरोधात मत्स्यखाद्य उत्पादकांनी (फिश मिल) गुरुवारपासून देशव्यापी बेमुदत संप सुरू केला आहे. त्यांच्याकडून व्याज आणि दंडासकट ही करवसुली करण्याचे आदेश देण्यात आले असून अनेक उत्पादकांना नोटिसाही बजावल्या गेल्या आहेत.
पूर्वी कोणताही कर नव्हता त्यामुळे फिश मिल उत्पादकांनी जीएसटीही भरला नव्हता, मात्र डिसेंबर 2018 मध्ये त्यांच्याकडून 5 टक्क्यानी जीएसटी वसुलीचे आदेश सरकारने काढले. ऑगस्ट 2019 पासून आम्ही जीएसटी भरण्यास तयार आहोत परंतु जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंतचा जीएसटी घेतला जाऊ नये अशी मागणी ऑल इंडिया फिश मिल ऍण्ड ऑइल मॅन्युफॅक्चरर्स ऍण्ड मर्चंटस् असोसिएशनने केला आहे.



























































