
महामुंबई मेट्रो कार्पेरेशानकडून चालवल्या जाणाऱ्या अंधेरी-दहिसर-गुंदवली मेट्रो मार्गावर गेल्या सतरा महिन्यात तब्बल पाच कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. ट्रफिकशिवाय मेट्रो प्रवास होत असल्याने मुंबईकरांकडून मेट्रो प्रवासाला पंसती दिली जात आहे.एमएमआरसीएलकडून 2-अ आणि 7 या मार्गावर सकाळी सहा वाजलेपासून रात्री साडेनऊ वाजेपरर्यंत दररोज 236 फेऱया चालवल्या जातात. त्यामध्यमातून एप्रिल 2022 पासून आतापर्यंत 5 कोटी 5 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. मेट्रो प्रवाशांची संख्या दर महिन्याला पाच टक्क्यांनी वाढत असल्याचे मेट्रोचे सीएमडी संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे. सध्या मेट्रो प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळे प्रवासी संख्या अशीच वाढत राहिल असा विश्वस त्यांनी व्यक्त केला आहे.



























































