
जागतिक फार्मास्युटिकल ‘फायझर’ कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अल्बर्ट बोरला यांना बुधकारी कोविड-19 लस विकसित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी प्रतिष्ठत ‘जेनेसिस पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
मानवतेसाठी योगदान आणि ज्यू मूल्यांच्या वचनबद्धतेसाठी प्रत्येक वर्षी एक दशलक्ष डॉलर्सचा पुरस्कार एखाद्या व्यक्तीला त्यांच्या व्यावसायिक कामगिरीसाठी दिला जातो. जेनेसिस प्राइज फाऊंडेशनने सांगितले की, बोरला यांना निवडीसाठीच्या ऑनलाइन मोहिमेत सर्वाधिक मते मिळाली होती. या मोहिमेत 71 देशांतील सुमारे 2,00,000 लोकांनी भाग घेतला होता. कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकन सरकारचा निधी नाकारण्याच्या ‘फायझर’च्या निर्णयाचा फाऊंडेशनने उल्लेख केला आहे. या निर्णयामुळे कंपनीला लसीचा विकास जलद करण्यास मदत झाली.
फाऊंडेशनने जारी केलेल्या निवेदनात बोरला म्हणाले की, ‘तो पुरस्कार नम्रपणे आणि माझ्या सर्व ‘फायझर’ सहकाऱयांच्या वतीने स्वीकारत आहे. मी एका ज्यू कुटुंबात लहानाचा मोठा झालो. माझ्या कुटुंबीयांचा मानणे आहे की आपण समाजाचे देणे लागतो. आपल्या सर्वांना समाजाच्या विकासासाठी इथे आणले आहे,’ असे बोरला म्हणाले. डिसेंबर 2020मध्ये आणीबाणीच्या वापरासाठी अमेरिकेची मान्यता मिळविणारी ‘फायझर’ची कोरोना लस ही पहिली होती.




























































