रिक्षापेक्षा विमान प्रवास स्वस्त – जयंत सिन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, गोरखपूर

सध्या देशात ऑटो रिक्षापेक्षा विमान प्रवास स्वस्त झाला आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रतिकिलोमीटरचा विचार केल्यास ऑटो रिक्षापेक्षा हवाई तिकीट स्वस्त पडते असा दावा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सोमवारी केला. उत्तर प्रदेशातील गोरखपूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल बिल्डिंगच्या उद्घाटन सोहळय़ात ते बोलत होते. जेव्हा दोघे जण रिक्षाने प्रवास करतात तेव्हा दहा रुपये भाडे आकारले जाते. पण तेच हवाई प्रवासात प्रतिकिलोमीटरसाठी चार रुपये मोजावे लागतात. याचा अर्थ रिक्षासाठी किलोमीटरमागे पाच रुपये आकारले जातात, असे स्पष्टीकरण सिन्हा यांनी पुढे केले.