आसाममध्ये पुराचा कहर; 33 जणांचा मृत्यू, लाखो विस्थापित

458

आसाममध्ये पुराने हाहाकार माजवला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच लाखो लोकांना पुराचा फटका बसला आहे. फक्त मनुष्यच नाही तर जनावारांनाही या पुराचा फटका बसला आहे.

आसामामध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 लाख लोक विस्थापित झाले आहेत. पुरामुखे राज्यातील 23 जिल्ह्यांना फटका बसला आहे. तर 75 लाख 700 हेक्टर जमिनीवरील पीक नष्ट झाले आहे. 20 लाख प्राणी या पुरामुळे विस्थापित झाले आहे. 21 जिल्ह्यात मदत छावणी उभारण्यात आली आहे. त्यात 25 हजार 461 लोकांना ठेवण्यात आले आहे.

गुजरात आणि बिहारमध्ये वीज कोसळून मृत्यू
गुजरात आणि बिहारमध्ये पावसाचा कहर सुरू आहे. गुजरातमध्ये वीज कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच बिहारमध्येही वीज कोसळून 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या