वादळी वाऱ्यामुळे चारा छावणीचे जवळपास दोन लाखाचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, अहमदपूर

तालुक्यातील धसवाडी येथे दिव्य ज्योत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई तथा प.पू क्रांतीकारी जैन मुनिश्री विनम्रसागरजी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार चारा छावणी उभारण्यात आली.असून यंदा सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांची खरिपातील पिके हातची गेली होती. रबी हंगामात पेरणीचे क्षेत्र घटल्याने चाऱ्याची टंचाई डिसेंबर महिन्यापासून जाणवू लागली होती. पशुपालकांसमोर चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. अनेक पशुपालक आपले पशुधन बाजारामध्ये कवडीमोल विक्री करत आहेत.

सविस्तर माहिती अशी की, पशुपालकांसमोर जनावरांसाठी चाऱ्या प्रश्न गंभीर बनला असून अहिंसा संघ मुंबईच्या वतीने अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथे चारा छावणी सुरू केली असून संघाच्या वतीने या छावणीत सध्या 975 जनावरांना छावणीत चारा पुरवीला जात आहे. खंडाळी, धसवाडी, अंधोरी,येस्तार,पार,डूमनरवाडी,उमटवडी, पांढरेवाडी, कोपनरवाडी, घंटग्रा, गंगा हिप्परगा, नागझरी, उजना, वंजारवाडी, हाळी, हंडरगुळी,टाकळगाव, सुमठाणा अहमदपूर तालुकासह गंगाखेड, उदगीर तालुक्यातीलही गावची जनावरे या चारा छावणीमध्ये आहेत.

तालुक्यात सतत निर्माण होणा-या दुष्काळामुळे शेतकरी पशुपालकांची आर्थिक स्थिती कोलमडून जात आहे. यंदाच्या भीषण दुष्काळामुळे डिसेंबर महिन्यापासूनच पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी चाऱ्या अभावी पशुधन बाजारात विक्री करण्यावर भर दिला होता.चारा छावण्या सुरू करण्याच तालुक्यातील अनेक संघटनांच्या वतीने प्रशासनाकडे मागणी लावून धरण्यात आली होती. शिवाय अनेक संस्थांनी प्रस्तावही सादर केले होते. मात्र प्रशासन चारा छावणीसाठी उदासिन असल्यामूळे अहिंसा संघातर्फे पहिली चारा छावणी अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथे सुरू केली. असून संघाच्या वतीने 2014 पासून तालुक्यात चारा छावणी उभारण्यात येत आहे. एका जनावराला चारा, पाणी, सुग्रास, मजूर याचा विचार करता 70 रुपये प्रति पशुवर खर्च केला जात आहे.या चारा छावणीमध्ये 28 गो सेवक असून जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दोन डॉक्टर आहेत. संघाच्या वतीने ऑक्टोबर पासून चारा जमा करण्यात आला. असून एकूण सव्वा लाख पेंडी चारा गोळा करण्यात आला असून दिवसाला एक किलो सुग्रास देण्यात येते.या चारा छावणीमुळे तीन जिल्ह्यासह तालुक्यातील 20 ते 30 गावांच्या पशुपालकांचा चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे. कालच्या मान्सूनपूर्व वादळी पावसामूळे चारा छावणीवरील नेट,दांडया असे एकूण जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे.

अहमदपूर तालुक्यासह शेजारील तालुका व जिल्हयातील ही पशुपालकांनी आपले पशुधन अहिंसा संघाच्या अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथील चारा छावणीत आणून सोडले. त्या पशुधनाची सर्व व्यवस्था संघाच्या वतीने करण्यात आली होती. कालच्या वादळी वाऱ्यामुळे चारा छावणीचा जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे. असे अहिंसा संघाचे संग्राम नागपूर्णे यांनी सांगितले.