विवाहासाठी स्थळ निश्चिती करण्यासाठी आलेल्या 45 लोकांना विषबाधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । किनवट

विवाह सबंधातील नवे स्थळ निश्चीत करण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना व गावातील 45 लोकांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना किनवट तालुक्यातील सावरगाव तांडा येथे घडली आहे.

तेलंगाणा राज्यातील मंडल सारंगपूर येथील सोनापूर येथील विवाह संबंधा बाबतीत स्थळ निश्चीत करण्यासाठी सावरगाव तांडा येथील जवाहरसिंग मेरसिंग पडवळे यांच्या घरी पाहुणे म्हणून आले होते. रितीरिवाजा प्रमाणे मुलीकडच्या मंडळींनी मुलाकडील सर्व पाहुणे मंडळीशी नवीन स्थळा बाबत चर्चा करुण स्थळ निश्चित करण्याचे ठरले. याचसाठी मुलाकडील मंडळीनी पाहुण्यासाठी व गावातील लोकांसाठी जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. जेवणाच्या कार्यक्रमातून आलेल्या पाहुण्यांना व गावातील लोकांना अशा एकूण 45 जणांना विषबाधा झाली. लोकांना उलटया होत असल्याने त्यांना जलधारा येथील प्राथमीक आरोग्य केंन्द्रात उपचारासाठी दाखल केले असता त्या पैकी सात जणांना प्रथम उपचार करुण पुढील उपचारासाठी किनवट येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.

दरम्यान, ही विषबाधा शिजवलेल्या अन्नात पाल पडल्याची प्राथमीक माहीती समोर येत आहे. या घटनेनंतर उपचार करण्यासाठी ईस्लापूर येथून डाँक्टराचे पथक बोलावले होते. औषधोपचारानतंर विषबाधा झालेल्या लोकांची प्रकृती चांगली असल्याचे समजते.