लस घेतल्यानंतर असा ठेवा तुमचा आहार, प्रतिकारकक्षमता आणखी वाढेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनापासून बचावासाठी सध्या लस घेणे हे आंत्यंतिक महत्त्वाचे झाले. देशभरात सध्या 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. लस घेतल्यानंतर काहींना मळमळ, डोकेदुखी, अंगदुखी, ताप असे त्रास झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या त्रासांपासून बचावासाठी तसेच लस घेतल्यानंतर शरीराची प्रतिकारक क्षमता (इम्युनिटी) आणखी वाढविण्यासाठी जर तुम्ही तुमचा आहार समतोल ठेवलात तर खूप फायदा होईल. आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगत आहोत ज्याच्या वापराने तुमची लस घेतल्यानंतरचे साईड इफेक्ट कमी होतील व तुमची इम्युनिटी वाढेल.

onion-new
लसूण कांदा हे इम्युनिटी बूस्टर मानले जातात. लस घेतल्यानंतर कच्चा लसूण खाणे फायदेशीर ठरेल. कच्च्या लसूणात लोह, विटामिन B6, फायबर, विटामिन C सोबतच काही प्रमाणात, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, कॉपर असतं. त्यात अँटीऑक्सिडन्टचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळे कच्च लसूण खाल्ल्याने फायदा होतो. कांद्याचाही जेवणात बऱ्यापैकी वापर करावा

garlic

ज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते अशी फळं खावी. कलिंगड, टरबूज, जांभूळ, अणणस, चिकू, आंबा, केळं अशी फळं शरीरातील पाणी टिकवून ठेवतात व त्यामुळे लस घेतल्यानंतरचे साईड इफेक्ट कमी होतात.

fruits

हिरव्या भाज्या – हिरव्या भाज्या या प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी फायदेशीर असतात. सलादच्या रुपात त्यांना कच्चे खाल्ल्याने जास्त फायदा होतो. किंवा त्यांचे सूप बनवूनही तुम्ही पिऊ शकता. तुमच्या जेवणाच्या ताटात दररोज एक पालेभाजी असू द्या.

palak-6

हळद – हळद ही औषधी असल्याने त्याचे शरीराला बरेच फायदे होतात. हळदीमुळे पचनशक्ती वाढते, तणाव कमी होतो व शरीराची सूजही कमी होते. दररोज हळदीचे दूध पिणे फायद्याचे ठरते. मात्र जेवणात हळद वापरताना ती तेलावर कधीच फोडणी घालू नये कारण त्यामुळे त्यातील जीवनसत्त्व मरतात.

turmeric

लस घेतल्यानंतर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होता कामा नये. शरीर अॅक्टिव्ह राहिले पाहिजे. त्यामुळे लस घ्यायच्या काही दिवस आधीपासूनच भरपूर पाणी प्यायला सुरुवात करा. तसेच घेतल्यानंतरही पाणी पीत राहिले पाहिजे. मात्र थंड पाणी पिऊ नये. तसेच हर्बल टी, सूप, काढे, ज्यूस देखील पिऊ शकता.

drinking_water