फोर्ब्ज कोरोनागार्ड हवेतील एव्हियन कोरोनाविषाणू निष्क्रिय करण्यास सक्षम; आयआयटीने केल्या चाचण्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या जागतिक संकटाने 2020 हे वर्ष आपल्या सर्वांसाठी अत्यंत कठीण ठरले. या संकटाचा सामना करण्यासाठी युरेका फोर्ब्ज आणि शायकोकॅनचे बेंगळुरूस्थित शास्त्रज्ञ डॉ. राजाह विजय कुमार यांच्या संशोधनातून नवे उपकरण तयार झाले आहे. हे उपकरण हिंदुस्थानात युरेका फोर्ब्जने फोर्ब्ज कोरोनागार्ड या ब्रॅण्डनेमखाली (पॉवर्ड बाय शायकोकॅन) उत्पादित केले आहे आणि त्याचे मार्केटिंग केले आहे. हे पीएमईई तंत्रज्ञान विषाणूच्या हवेत घर करण्याच्या यंत्रणेला निष्क्रिय करते. तसेच त्याचा प्रादुर्भाव कमी करते. त्यामुळे विषाणूला मनवी शरीरात प्रवेश करता येत नाही.

फोर्ब्ज कोरोनागार्डच्या कार्यक्षमतेची चाचणी प्रतिष्ठेच्या गुवाहाटी भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) घेतली असून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. हवेच्या निर्जंतुकीकरणाची चाचणी एव्हियन कोरोनाविषाणूवर घेण्यात आली. हा विषाणू सार्स कोव्हक-2 परिवारातील आहे. नियंत्रित चेंबरमध्ये फोर्ब्ज कोरोनागार्ड एव्हियन कोरोनाविषाणूला निष्क्रिय करण्यात उत्तम कामगिरी बजावतो हे आयआयटी गुवाहाटीने बीएसएल टूच्या तपशिलांनुसार घेतलेल्या गृहोपयोगी उपकरणाच्या चाचणीमध्ये सिद्ध झाले आहे. या चाचणीच्या अहवालाने फोर्ब्ज कोरोनागार्डची निर्जुंतिकीकरण कार्यक्षमता निर्णायकरित्या सिद्ध केली आहे.

फोर्ब्ड कोरोनागार्ड मानवी पेशींसाठी सुरक्षित आहे हे सिद्ध करण्यासाठी आयआयटी गुवाहाटीने ‘सेल टॉग्झिसिटी स्टडी’ही केली. यात फोर्ब्ज कोरोनागार्डचे स्वरूप बिनविषारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. युरेका फोर्ब्जच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख तसेच प्रमुख ट्रान्सफॉर्मेशन अधिकारी शशांक सिन्हा या उत्पादनाबद्दल म्हणाले, युरेका फोर्ब्जमध्ये आमच्या प्रत्येक कृतीच्या केंद्रस्थानी ग्राहकांची सुरक्षितता व आरोग्याचा विचार असतो. आमचे ग्राहक आमच्यावर विश्वास टाकतात.आमच्या प्रत्येक उत्पादनाला उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम तज्ज्ञांचा पाठिंबा असेल, याची काळजी आम्ही घेतो. युरेका फोर्ब्जमध्ये, आम्ही गेल्या सुमारे 40 वर्षांत कधीही अयोग्य, कनिष्ठ दर्जाचे किंवा चाचण्या न केलेले कोणतेही उत्पादन ग्राहकांना दिलेले नाही. हे उत्पादन केवळ परिणामकारकच नाही, तर सुरक्षितही असलेच पाहिजे याकडे आमचा कटाक्ष असतो. युरेका फोर्ब्ज जे दावे करते त्याला आवश्यक त्या संशोधनाचे पाठबळ असते. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांकडून आम्ही संशोधन करवून घेतो.

युरेका फोर्ब्जच्या फोर्ब्ज कोरोनागार्डला व्हीरिसायडल (विषाणूमारक) आणि निर्जुंतुकीकरण कार्यक्षमतेबाबत अनेक प्रमाणपत्रे/मंजुऱ्या प्राप्त झालेल्या आहेत. उपकरणाची मानव व प्राण्यांबाबतची सुरक्षितता तपासण्यासाठी अनेक सेल्युलर व्हाएबिलिटी तसेच टॉग्झिसिटी अभ्यास झाले आहेत. ओझोन उत्सर्जन आणि विद्युतचुंबकीय हस्तक्षेपाच्या (ईएमआय) तसेच विद्युतचुंबकीय क्षमतेच्या (ईएमसी) चाचण्या झाल्या आहेत. यापूर्वीही फोर्ब्ज कोरोनागार्डची चाचणी, सीओईएफपीआरआयएसने अधिकार प्रदान केलेल्या लॅबोरेटोरिओ दे एस्पेशियालीदाद्स एस.ए. दे सी.व्ही.ने, केली आहे. ही चाचणी इक्वाइन अर्टेरायटिस विषाणूसोबत करण्यात आली आहे. हा विषाणू कोरोना विषाणूच्याच क्रमातील आहे आणि तो नष्ट करण्याची क्षमता 99.9 टक्के एवढी निश्चित झाली आहे.
आयएपीएमओ- अक्वाडायग्नोस्टिक्सने (एनएबीएल अँड डब्ल्यूक्यूए मंजुरीप्राप्त प्रयोगशाळा) एमएसटू फेज या सर्वांत कठीण नॉन-एन्व्हलप्ड विषाणूवर (हा एअरोसोल चाचण्यांसाठी ईपीएची मंजुरी प्राप्त झालेला सरोगेट आहे) चाचणी घेतली आणि 99.99 टक्के परिणामकारकतेवर शिक्कामोर्तब केले. आयआयटी गुवाहाटीमध्ये एव्हिअन कोरोनाविषाणूचा अभ्यास केला. हा विषाणूही कोरोनाव्हारिडे समूहातील आहे आणि त्याला निष्क्रिय करण्यात उपकरण 100 टक्के परिणामकारक ठरल्याचे दिसून आले.