सांगलीच्या पठ्ठय़ानं वारणेच्या काठावर फुलवला विदेशी भाज्यांचा मळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाश्चिमात्य देशांमध्ये लोकप्रिय असलेली लाल भेंडी आता आपल्या राज्यातही पिकायला सुरुकात झाली आहे. केवळ लाल भेंडीच नव्हे तर पारसली, आईसबर्ग लेटय़ूस, पोकचोई अशा विदेशी भाज्याही आपल्याकडे पिकतात. सांगली जिह्यात वारणा नदीच्या काठी असलेल्या ऐतवडे खुर्द गावातील सदाशिव राजेंद्र घेवारे या कॉलेज तरुणाने हा प्रयोग यशस्वी केला आहे.

सदाशिव घेवारे हा डी. वाय. पाटील आर्किटेक्टचर कॉलेज, कोल्हापूर येथे चौथ्या वर्षात शिक्षण घेत आहे. सोबतच प्रयोगशील शेतीही करत आहे. सदाशिवने 2017 साली भात, सोयाबीन, ऊस ही पारंपरिक पिके घेत परदेशी भाजीपाल्यांची लागकड सुरू केली. कॉलेज सांभाळून शनिवारी- रविवारी सुट्टीच्या दिवशी त्याने शेतीमध्ये प्रयोग करायला केली.

आज ताराकाकी एक्झोटिक ऍग्रो फार्म या आजीच्या नावाने सुरू केलेल्या शेतात तो 11 परदेशी भाज्यांची लागवड करून निर्यात करत आहे. मुंबई, पुणे, बंगळुरु, गोवा, इंदूर, हैदराबाद, दिल्ली येथील पंचतारांकित हॉटेलात भाज्या जातात. रंगीबेरंगी देशासाठी रंगीबेरंगी भाज्या हे ब्रीद कापरून तो रंगीत भाज्यांचे पीक घेतोय. नुकताच त्याने लाल भेंडीचा प्रयोग यशस्वी केला. वाराणसी येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ क्हेजिटेबल रिसर्च येथील शास्त्रज्ञांनी 1996 पासून सुरू केलेल्या लाल भेंडीच्या संशोधनला गेल्यावर्षी यश मिळाले. काशी लालीमा नाव असलेल्या या भेंडीची लागवड करून या युवा शेतकऱयाने काळ्या मातीत यशस्वी प्रयोग केला आहे.

रंगीत भाज्या कोणत्या

लाल भेंडी, पारसली, आईसबर्ग लेटय़ूस, पोकचोई, बेबी कॉर्न, ब्रोकोली, रेडकॅबेज, चायना कॅबेज, हिरवी झुकिनी, पिवळी झुकिनी, लीक, सेलरी या भाज्यांचे पिक सदाशिक सध्या घेत आहे.

येत्या काळात पाण्याकर शेती

येत्या काळात हायड्रोपोनिक्स शेती म्हणजे विना माती फक्त पाण्याकरची शेती करणार असल्याचे सदाशिव घेवारे याने ‘दैनिक सामना’शी बोलताना सांगितले. प्रवाहाच्या दिशेने पोहता येते पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहता आले पाहिजे. शेती असे धन आहे की आपण प्रामाणिक सेवा केली तर हे फळ मिळते. तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली पाहिजे, असे सदाशिव याने सांगितले.