फसवणूक करणाऱ्या भाजपला मलकापुरकरांनी नाकारले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कराड

ज्यांनी देशाची फसवणूक केली त्या भाजपाच्या नावाखाली मलकापुरात मते मागितली गेली पण मलकापुरची जनता फसली नाही. मलकापूर ही महाराष्ट्रातील आदर्श नगरपालिका करून दाखवण्यासाठी आता आपण प्रयत्न करू यात. निवडणुकीत दिलेले प्रत्येक आश्वासन पुर्ण करण्यासाठी नगराध्यक्षांसह सर्व विजयी नगरसेवकांच्या पाठीशी मी स्वता उभा आहे, असे आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदासह 15 जागांवर विजय मिळवला. नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.

मलकापुरची लोकसंख्या ज्या वेगाने वाढली त्या तुलनेत मलकापुरला नागरी सुविधा दिल्या. जे विकास करतात त्यांच्या पाठिशी मलकापुरची जनता राहिली. देशात ज्यांनी फसवणूक करून सत्ता मिळवली त्यांना मलकापुरवासियांनी थारा दिला नाही असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.