शीला दीक्षित अनंतात विलीन, चाहत्यांनी साश्रूनयनांनी दिला निरोप

26

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. दिल्लीत मुसळधार पाऊस कोसळत असतानाही आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांनी व वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी गर्दी केली होती. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

शीला दीक्षित यांचे शनिवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास दिल्लीतील एस्कॉर्ट रुग्णालयात निधन झाले. रविवारी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेसच्या मुख्यालयात ठेवण्यात आले होते. तेथे युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियंका गांधी, कमलनाथ, मनमोहन सिंह, भाजपचे ज्य़ेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

आपली प्रतिक्रिया द्या