राणेंच्या पावणेचार कोटींच्या थकबाकीची 25 लाखांत मांडवली!

 तब्बल पावणेचार कोटी रुपयांचा मिळकतकर थकविल्याप्रकरणी भाजपच्या नीलेश राणे यांच्या शहराच्या मध्यवर्ती भागात आर डेक्कन येथील हॉटेलला पुणे महापालिकेने सील ठोकले. त्यानंतर 25 लाख रुपयांचा धनादेश दिल्यानंतर पुणे महापालिकेने 3 कोटी 52 लाख 53 हजार 803 रुपयांच्या थकबाकीचा वाद दाखवत थकबाकी शून्य करून टाकली. त्यामुळे अवघ्या 25 लाखांत मांडवली करून महापालिकेकडून राणेंना साडेतीन कोटींची मिळकतकरात सवलत मिळाली का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच या मिळकतीच्या मालकीवरूनही पालिकेने घुमजाव केले आहे.

आर डेक्कन मॉलची मिळकत ही एसएनएस कमर्शियल प्रिमायसेस प्रा. लि. आणि मे. रीट चॉईस टी पंपनी प्रा.लि. यांच्या मालकीची असून, पेंद्रीय मंत्र्यांचा याच्याशी संबंध नसल्याचा दावा महापालिकेने केला आहे. मात्र, एसएनएस कमर्शियल प्रिमायसेस प्रा. लि. या पंपनीच्या संचालकांमध्ये नितेश नारायण राणे, नीलम नारायण राणे, नीलेश नारायण राणे, ऋतुजा नितेश राणे यांची नावे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेकडून दबावामुळे घुमजाव केला जात असल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात आहे.